राज्यातील 58 तहसिलदार झाले उपजिल्हाधिकारी त्यात राहुरीला तहसिलदार म्हणून राहीलेले संध्या नाशिक येथे कार्यरत अनिल दौडे हे ही झाले उपजिल्हाधिकारी असा आदेश निर्गमित करण्यात आला आहे
भाचा कधीच येणार नाही मामाच्या गावाला… राहुरी। शिवाजी घाडगे प्रत्येक व्यक्तीला आपल्या मामाचं गाव जिव्हाळ्याचं असतं. कारण बालपणीच्या निरागस आठवणी, पहिल्या हशा-खेळा, मातीचा वास आणि माणसांचा ओलावा याच गावात जपलेला असतो. देवळाली प्रवरा हेच असे एक गाव होते—जिथे भाचे अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या आयुष्याच्या आठवणींचं माहेरघर होतं. “बालपणाचा काळ म्हणजे सुखाचा काळ” असे म्हणतात, आणि ते अजितदादांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. देवळालीच्या जत्रेतली भेळ, गोडीशेव, लहानपणी खेळलेले गोट्या, कोया, सुरपारंब्या, विट्टी-दांडू—या साऱ्या खेळांमध्ये त्यांचं बालपण हरवलेलं होतं. इथंच शिक्षण घेत, मातीशी नातं घट्ट करत ते मोठे झाले. राज्याच्या राजकारणात ते “साहेब” झाले, पण देवळालीसाठी ते नेहमीच ‘दादा’ राहिले. देवळाली प्रवरा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी एक आठवण सांगितली होती— “आम्ही देवळाली प्रवरातून ज्वारीच्या बैलगाडीतून काटेवाडीला जायचो.” देवळालीत कदम कुटुंब हे ...
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे डाॅक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्ष पदी जिल्हा बॅकेचे संचालक तथा राहुरी बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांची निवड. गुरुवारी विवेकानंद नर्सिग होम मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली यात जनसेवा मंडळावर वर सभासंदानी विश्वास दाखवत 21 संचालक निवडुन दिले संध्या कारखान्यांवर प्रशासक होता तर जिल्हा बॅकेच्या ताब्यात हा कारखाना असून कर्ज वसुली साठी बॅकेने तीनदा निविदा जाहीर केल्या होत्या राहुरी बाजार समितीचा उत्तम कारभाराची हातोटी असलेले अरुण तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद देखील भोगले असून येथे आपल्या कामाचा ठसा उमटवून त्यांचे पिताश्री दिवगंत माजी आमदार व या कारखान्याचे अध्यक्ष डाॅक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या नंतर तनपुरे कुटुंबातील अरुण तनपुरे हे तिसरे चेअरमन आहेत त्याचे मोठे बंधु माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तेरा वर्ष या कारखान्याचे अध्यक्ष पद उपभोगलेले असुन या संचालक मंडळात त्याचे चिरंजीव हर्ष तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावस...
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत घाडगे न्यूज @ प्रतिनिधी अहिल्यानगर सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्यातील नुकसान ग्रस्ता साठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले असून अहिल्यानगर साठी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ को...
Comments
Post a Comment