Posts

Showing posts with the label 20 नोव्हेंबरला मतदान

विधानसंभा मतदान केंद्रांवर मोबाईल नेता येणार नाही आदेश निर्गमित

Image
मतदान केंद्रांवर मोबाईल नेता येणार नाही   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २० नोव्हेंबर रोजी मतदान  असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये  निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहे. मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही.  उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीलादेखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही.  मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. छुप्यारितीने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या  ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निरिक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरि...