पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा गौरव
पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा साई प्रतिष्ठानकडून स्नेह सत्कार समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला. साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकार समाजासाठी दिवस-रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात. या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षांपासून जपली आहे. पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या ...