वृक्ष लागवड करुन पर्यावरण संरक्षण करा
वृक्ष लागवड करा पर्यावरण वाचवा संकल्प @शिवाजी घाडगे शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उमेद, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पांचा काळ असतो. अशा वेळी केवळ शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता पर्यावरण संरक्षणाचाही संकल्प प्रत्येकाने करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात सोपा, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. काँक्रीटच्या जंगलात हिरवाई झपाट्याने कमी होत असून त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यातील वाढती उष्णता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील बदल ही त्याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ...