श्रीरामपूरात मोकाट रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी वर कारवाई
मोकाट फिरणाऱ्या सह सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांचा दणका घाडगे न्यूज| प्रतिनिधी श्रीरामपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी विनाकारण मोकाट फिरणाऱ्या, मोकळ्या मैदानांवर बसून मद्यपान करणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पुढाकारातून रविवारी रात्री श्रीरामपूर शहरातील विविध मोकळ्या मैदानांवर अचानक पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच आरसीपी पथकाने शहरातील विविध ठिकाणी अचानक गस्त घातली. या पथकाने थत्ते मैदान तसेच महाले-पोद्दार शाळेसमोरील क्रिकेट मैदान येथे विशेष तपासणी केली. या मैदानांवर रात्रीच्या वेळी विनाकारण बसून राहणाऱ्या तरुणांची तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, विनाकारण गर्दी करणे आणि नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वर्तन करणा...