Posts

Showing posts with the label अहिल्याबाई होळकर बारव..

मुक्ताई बारवेला नवसंजीवनी

Image
८०० वर्षे जुन्या मुक्ताई बारवेला नवसंजीवनी  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्याबाई होळकर बारव पुनर्जीवन व पुनर्वापर मोहिमेंतर्गत नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील सुमारे ८०० वर्षे जुन्या ऐतिहासिक मुक्ताई बारवेला नवसंजीवनी मिळाली आहे. गावकऱ्यांच्या प्रयत्नातून आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने या पुरातन बारवेची स्वच्छता व पुनरुज्जीवन करण्यात आले असून, आता ती पुन्हा वापरात आणण्यात आली आहे. या पुनर्जीवित मुक्ताई बारवेचा लोकार्पण सोहळा १९ ऑगस्ट रोजी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार विठ्ठल लंघे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पिचडगाव येथील मुक्ताई बारवेला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. सुमारे आठ शतकांपूर्वी बांधण्यात आलेली ही बारव केवळ पाण्याचा स्रोत नसून, परिसराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मृती जपणारा महत्त्वाचा ठेवा मानला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानकाका आणि संत मुक्ताई यांच्या परंपरेशी या परिसराचा संबंध जोडला जात असल्याने मुक्ताई ...