ऊसाचा पाच हजार उचल दया
ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल द्या; राहुरीत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन राहुरी । ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल मिळावी, साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी आणि ऊस वजनातील काटामारी थांबवावी, यांसह विविध मागण्यांसाठी रविवारी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऊस उत्पादनासाठी वाढलेला खर्च, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या वाढलेल्या किमती आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर उसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल देण्यात यावी, ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करण्यात यावी, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करण्यात यावा आणि कारखान...