Posts

Showing posts with the label शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रसारीत तंत्रज्ञान उपयोग उत्पन्न भारी डाॅ नंदकुमार कुटे

Image
प्रसारीत तंत्रज्ञानाचा  अवलंब केल्यास तुरीचे उत्पन्न दिडपट - प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे कृषी विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तुरीच्या सुधारीत वाणांचा व शिफारशींचा अवलंब करुन तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पन्न दिडपट वाढते असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने कुंभारगाव, ता. करमाळा येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवार फेरी व शेतकरी मेळावा कार्यक्रमात डॉ. नंदकुमार कुटे बोलत होते. यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ, रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी  देविदास चौधरी, सत्यवान देशमुख, कुंभारगांव अ‍ॅग्रोचे निमंत्रक  महेंद्र देशमुख व प्रगतशिल शेतकरी  गणेश धुमाळ उपस्थित होते.  यावेळी डॉ. कुटे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, तुरीची लागवड वाढावी व तूरीचे उत्पन्न वाढावे म्हणून कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीचे शास्त्रज्ञ जमि...