स्वच्छ व सुंदर संत ज्ञानेश्वर शाळा
स्वच्छ व सुंदर शाळा – संत ज्ञानेश्वर विद्यालय शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे साहेब व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी विवेकानंद ट्रस्टचे उपाध्यक्ष व प्राचार्य भारत वारुळे यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या उपक्रमामुळे शाळेचा आणि परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला आहे. पूर्वी साधा वाटणारा शाळेचा परिसर आज “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून लावलेल्या झाडांमुळे हिरवागार, फुलांनी नटलेला आणि प्रसन्न झाला आहे. झाडे कधी वाढली, कधी बहरली हे कळलेही नाही; मात्र आज संपूर्ण परिसर निसर्गरम्य दिसतो. पूर्वी विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत जमिनीवर बसून मध्यान्ह भोजन घेत असत. त्यानंतर टाकळीमिया ग्रामपंचायतीचे सरपंच गायकवाड यांनी समोरील मैदानावर खडी टाकून दिली. कडेला वृक्षलागवड करण्यात आली. शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली आणि समोर भव्य क्रीडांगण विकसित करण्यात आले. आजूबाजूची अतिक्रमणे सामंजस्याने दूर करण्यात आली. हे सर्व परिवर्तन शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी य...