पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा सहभाग
पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा हातभार? एलसीबीच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ राहुरी।घाडगे न्यूज पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या ड्रग्ज तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का देत पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात कारवाई करत गॅरेज चालक शदाब शेख याला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचा ड्रग्ज व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून तपासादरम्यान नगर पोलिस दलातील एका पोलिसाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एलसीबीकडून कसून चौकशी केल्यानंतर ड्रग्ज तस्करीच्या या साखळीत केवळ बाहेरील गुन्हेगारच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले काही घटकही सहभागी असल्याचा संशय बळावला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पुणे एलसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस दलाची विश्वासार्हता धोक्यात महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी काही दिवसांपूर्वीच मल्टीस्टेट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी पैसे घेतल्याच्या आरोपांमुळे पोलीस दल अडचणीत...