Posts

Showing posts with the label जलव्यवस्थापन पंधरवाडा

जलसंपदा आपल्या गावात

Image
जलसंपदा आपल्या गावात उपक्रमास प्रारंभ  - जल व्यवस्थापन कृती पंधरवाडानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जलसंपदा कृती व्यवस्थापन घरोघरी पोहोचविण्यासाठी 'जलसंपदा आपल्या गावी' उपक्रमास सुरूवात करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, जलसंपदा विभाग समन्वयक राजेंद्र कासार, वाघाड प्रकल्पाचे समन्वयक हनुमंत देशमुख उपस्थित होते.    पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, अनधिकृत उपसा बंद करण्याबरोबरच लाभक्षेत्रातील पिकांना प्रथम प्राधान्याने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. आवर्तन कालावधीमध्ये कालव्यातून होणारी पाणी गळती थांबविण्यासाठी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.  राजेंद्र कासार म्हणाले, नियमितपणे चालणाऱ्या पाणी वापर  संस्थांना ५० ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या परताव्यातून  पाणी वापर संस्था आपल्या लाभक्षेत्रातील कालवे, चाऱ्यांची  दुरुस्ती कर...