Posts

Showing posts with the label विविध कामाचे लोकार्पण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज शिर्डी  हिंदुस्थान चे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी  गुरुवारी २६ ऑक्टोंबरला  शिर्डी येथे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करणार आहेत यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळालगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे,  रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.   शिर्डीत येणाऱ्या देश- विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे. यासाठी  साई संस्थानने  १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २...