येने केने मार्गाने गुन्हेगार सुटता कामा नये कायद्याचा कठोर बडगा हवा
"येन-केन प्रकारेण गुन्हेगार सुटता कामा नयेत कायद्याचा कठोर बडगा हवा!" स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येला अकरा दिवस पूर्ण झाले आहेत. अवघ्या तीस वर्षांच्या तरुणाची भरदिवसा हत्या होते आणि त्यानंतर संपूर्ण शहरात भीती, अस्वस्थता व संतापाचे वातावरण निर्माण होते. एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नाही, तर ती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे आणि कायदा-सुव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हानाचे प्रतीक बनली आहे. आज श्रीरामपूरातील व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारू लागले आहेत. दहशतीच्या सावटाखाली व्यवसाय करावा लागणे ही कोणत्याही प्रगत शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे. एकेकाळी गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटायचा. पोलिसांचा दरारा होता. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांनाही कायद्याची भीती वाटत होती. मात्र आज परिस्थिती बदलत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. "येन-केन प्रकारेण गुन्हेगार सुटता कामा नयेत" असे ठामपणे सांगण्याची हिंम...