63178 जात वैधता प्रमाणपत्र दिले
नगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल ६३१७८ जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे निकाली अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ७१९३९ ऑनलाईन प्राप्त प्रकरणांपैकी ६३१७८ जातवैधता प्रमाणपत्र वाटप करत राज्यात अव्वल ठरली आहे. याकामासोबतच समितीने बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. समितीने ११२ प्रकरणे अवैध ठरविलेली आहेत. एकेकडे राज्यात सर्वाधिक प्रकरणे निर्गमित करण्याबरोबरच बनावटगिरीला चाप लावण्याचे काम करणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात एकमेव आहे. जिल्हा समितीच्या या उल्लेखनीय कामकाजाबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी कौतूक केले आहे. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून समितीने जलद कामकाज केले आहे. राज्यातील जि...