राहुरी व बारामती विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी
राहुरी व बारामती पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाडगे न्यूज| प्रतिनिधी राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र, निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभानिमित्त ते उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता काही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, लोकशाही प्रक्रियेचा आदर ...