Posts

Showing posts with the label राजकारणातील खेळाडू

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची क्रिकेट मैदानात फटकेबाजी

Image
राजकारणाच्या मैदानात फटकेबाजी अन् क्रिकेटच्या मैदानातही ! पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात बॅट राहुरी । प्रतिनिधी राजकारणाच्या मैदानात विरोधकांचे चेंडू टोलवायची सवय असलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी चक्क क्रिकेटच्या मैदानात उतरून बॅट फिरवली आणि उपस्थितांना सुखद धक्का दिला! नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी, विकासकामांसाठी आणि बैठकांच्या धावपळीत व्यस्त असणारे विखे-पाटील आज मात्र काही काळासाठी राजकारण बाजूला ठेवून थेट क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसले. राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी मैदानात फलंदाजीसाठी हातात बॅट घेतली. गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आणि विखे-पाटील यांनीही फलंदाजीसाठी आपली भूमिका घेतली. त्यानंतर सुरू झाला चेंडू आणि बॅटचा सामना! गोलंदाजाच्या हातातून सुटणाऱ्या प्रत्येक चेंडूवर त्यांचे बारीक लक्ष होते. चेंडूची दिशा आणि टप्पा ओळखत त्यांनी बॅटने फटके लगावले. त्यांच्या या फटकेबाजीला उपस्थित क्रिकेटप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. खरे तर राजकारणात रोजच अनेक चेंडूंचा सामना करावा लागतो. कधी आरो...