Posts

Showing posts with the label धगधग सुरुच आहे

गुंड गिरीचा अंत हवा अरोपी नव्हे संपूर्ण खाखळी उध्दव करा

Image
 गुंडगिरीचा अंत हवा आरोपी नव्हे, संपूर्ण साखळी उद्ध्वस्त झाली करा  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूरमध्ये घडलेले आकाश दुबया हत्याकांड हे केवळ एका तरुण उद्योजकाच्या हत्येचे प्रकरण नाही. ही घटना शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीचे, कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्हाचे आणि समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचे विदारक प्रतीक आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एका गुन्ह्याच्या चौकशीच्या चौकटीत पाहून चालणार नाही. या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारीला पोषक ठरणारी संपूर्ण यंत्रणा उघड करणे आणि तिच्यावर कठोर प्रहार करणे ही काळाची गरज आहे. आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये अभूतपूर्व जनआक्रोश दिसून आला. व्यापारी, सामाजिक संस्था, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. हा उद्रेक केवळ एका हत्येच्या निषेधाचा नव्हता, तर अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या दहशतीविरुद्धचा होता. नागरिकांना सुरक्षित वातावरण हवे आहे. व्यवसाय करणाऱ्या तरुणाला भरदिवसा जीव गमवावा लागत असेल, तर कायद्याची भीती कोणाला राहिली आहे, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित हो...