Posts

Showing posts with the label भाजपा अथवा राष्ट्रवादी ?

उद्या मतदान यंत्रातून येणार राहुरीचा आमदार

Image
उद्या मतदान यंत्राच्या पोटातून येणार राहुरीचा आमदार घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी ४ एप्रिल रोजी जाहीर होणार असून, राहुरी कॉलेज येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, राहुरीचा पुढील आमदार कोणत्या पक्षाचा असेल हे उद्या स्पष्ट होणार आहे. अक्षय कर्डीले यांना वाढदिवसां निमित्त आमदारकीची गिप्ट मिळणार की वेंकटरमना गोविंदा  होणार हे समजायला अवघा एक दिवस उरला आहे  या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अर्थव म्हसे आणि महेश हापासे यांनी आपले नशीब आजमावले आहे. एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी सुमारे ५०.७५ टक्के म्हणजेच अंदाजे १लाख ६९ हजार ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा प्रतिसाद मध्यम असला तरी निवडणुकीची चुरस कायम राहिली आहे. रिंगणात सहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्...