उद्या मतदान यंत्रातून येणार राहुरीचा आमदार

उद्या मतदान यंत्राच्या पोटातून येणार राहुरीचा आमदार
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी ४ एप्रिल रोजी जाहीर होणार असून, राहुरी कॉलेज येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, राहुरीचा पुढील आमदार कोणत्या पक्षाचा असेल हे उद्या स्पष्ट होणार आहे. अक्षय कर्डीले यांना वाढदिवसां निमित्त आमदारकीची गिप्ट मिळणार की वेंकटरमना गोविंदा  होणार हे समजायला अवघा एक दिवस उरला आहे 
या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अर्थव म्हसे आणि महेश हापासे यांनी आपले नशीब आजमावले आहे.
एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी सुमारे ५०.७५ टक्के म्हणजेच अंदाजे १लाख ६९ हजार ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा प्रतिसाद मध्यम असला तरी निवडणुकीची चुरस कायम राहिली आहे.
रिंगणात सहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्यात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्याचा निकाल राहुरीच्या राजकारणाची दिशा ठरवणार ठरणार असून, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर