राहुरीत अज्ञात इसमाचा खुन
बेक्रींग @घाडगे न्यूज
राहुरी येथे मंगळवारी रात्री एका अज्ञात इसमाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राच्या आवारात अज्ञात व्यक्तीने इसमाच्या डोक्यात गंभीर मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
(शक्यतो घाडगे न्यूज असे फोटो देत नाही मात्र इसमाची ओळख पटवण्या साठी दिला त्याबद्दल वाचकाचे क्षमस्व)
Comments
Post a Comment