Posts

Showing posts with the label ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी सप्ताह निमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजन

Image
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन अहिल्यानगर । प्रतिनिधी जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार योगेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार  नागेश गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेचे वैभव जपणे, भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख नागरिकांना करून देणे तसेच मराठी भाषेबाबतच्या संशोधनाविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी का...