दि राहुरी अर्चन च्या चेअरमन पदी पुन्हा काळे
दि. राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड दि. राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड संस्थेच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी; संचालक मंडळाकडून अभिनंदन राहुरी अल्पावधीतच आपल्या कार्यपद्धतीमुळे नावारूपाला आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि. राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र विठ्ठल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. भनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. चेअरमनपदासाठी रामचंद्र काळे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांच्याविरोधात अन्य कोणताही अर्ज अथवा उमेदवारी नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. दि. राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धतीला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. सहकार क्षेत्रात संस्थेची ...