Posts

Showing posts with the label संगमनेर मध्ये मतपत्रिकेचा फोटो

अहमदनगर जिल्हा बॅकेला 99.27मतदान

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव; ९९.२७ टक्के विक्रमी मतदान राहुरी - प्रतिनिधी  जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील विविध सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९९.२७ टक्के मतदान झाले असून, हे आजवरचे सर्वाधिक मतदान मानले जात आहे. दरम्यान संगमनेर येथील मतदान केंद्रामध्ये मतपत्रिकेची व्हिडिओ शूटिंग केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे. जिल्ह्यात एकूण ३८४७ मतदार होते. त्यापैकी ३८०९ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. केवळ ३८ मतदार अनुपस्थित राहिले. प्राथमिक कृषी, बिगरशेती आणि शेतीपूरक या तीन प्रमुख मतदारसंघांसह राखीव प्रवर्गासाठी हे मतदान घेण्यात आले. पाच तालुक्यांचा आदर्श - शंभर टक्के मतदान जिल्ह्यातील अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांनी १०० टक्के मतदान करून आदर्श निर्माण केला आहे. अकोले तालुक्यात २३१ पैकी २३१, नेवासा तालुक्यात २४६ पैक...