खाकीतील विश्वासाचे प्रतीक रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बागाटे
खाकीतील विश्वासाचे प्रतीक नितीन बगाटे यांचा देशातील उत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत समावेश भाष्य।शिवाजी घाडगे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) उल्लेखनीय स्थान निर्माण करणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ यांच्या संयुक्त अभ्यासातून जाहीर करण्यात आलेल्या देशातील उत्कृष्ट पोलीस प्रमुखांच्या यादीत नितीन बगाटे यांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून या यादीत स्थान मिळविणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याने महाराष्ट्रातील पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. नितीन बागाटे सध्या रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असून, मे २०२५ पासून त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पारंपरिक पोलिसिंगबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, जलद प्रतिसाद यंत्रणा, गुन्हे तपासातील विश्लेषणात्मक पद्धती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला त्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे. सामा...