Posts

Showing posts with the label 11 हजारांचे बक्षीस जाहीर

छत्रपतीचे विटबनेतील अज्ञात आरोपी अद्याप मोकाट

Image
छत्रपतींच्या विटंबनेचा आरोपी अद्याप मोकाट; राहुरी पोलिसांनी जाहीर केले ११ हजारांचे बक्षीस, पण आरोपी कधी सापडणार? घाडगे न्यूज @प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध लावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राहुरी पोलिसांनी गुरुवारी केली. मात्र या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही बाब केवळ खेदजनक नसून संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी मानली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि दीड वर्ष उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांना एका विटंबनाखोराचा माग काढता आलेला नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचा अवमान ...