Posts

Showing posts with the label बदलीनंतर सत्कार

जिल्ह्याच्या विकासात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान- तात्कालिन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Image
विकास कामांतून जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान   - सिद्धाराम सालीमठ समाजाच्या सर्वच स्तरातील घटकाच्या कल्याणाची, त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी प्रशासकीय सेवेतून मिळत असते. याच मिळालेल्या संधीतून गत दोन वर्षात विकासकामांतून जिल्ह्याच्या वाढलेल्या लौकिकात सर्व विभागांचे सहकार्य मोलाचे ठरले. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य तसेच जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नसल्याचे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  व्यक्त केले.   जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, शासकीय सेवेमध्ये वेतन घेऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते.  जनकल्याणाची भावना मनी बाळगत दुसऱ्याचं दु:ख, त्यांच्या अडचणी आपल्या...