Posts

Showing posts from May, 2026

राहुरीत बेकायदेशीर ड्रोन थरार ड्रोन अस्तित्वावर शिक्कामोर्तब

Image
राहुरीत बेकायदेशीर ड्रोनचा थरार; अँटी-ड्रोनगण पथकाचे प्रयत्न निष्फळ, मात्र ड्रोनच्या वावरावर शिक्कामोर्तब राहुरी । राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनच्या गूढतेत रविवारी रात्री आणखी भर पडली. प्रशासनाने प्रथमच अँटी-ड्रोनगण यंत्रणेच्या माध्यमातून या ड्रोनचा मागोवा घेण्याचा आणि त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. कारवाईला यश मिळाले नसले तरी आकाशात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याची खात्री प्रशासन आणि नागरिकांना झाली आहे. रविवारी रात्री पुन्हा एकदा राहुरी परिसरातील नागरिकांच्या दृष्टीस आकाशात वेगाने हालचाल करणारे संशयास्पद ड्रोन पडले.  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांनी  पुणे येथील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून विशेष अँटी-ड्रोनगण पथक उपलब्ध केले असल्याने  यानंतर देवळाली प्रवरा-त्रिंबकपूर मार्ग परिसरात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पुण्यावरून आलेल्या अँटी-ड्रोनगण पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने ड्रोन...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात

Image
राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे  भाजपात विधान परिषद आमदार होणार  राजरंग । शिवाजी घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला रामराम ठोकत त्यांनी भाजपात प्रवेश केला. ऐके काळी राजकारणात कमळ बघ म्हणून तनपुरे कुटुंबाला राजकीय अव्हान दिले जायचे तेव्हा आता प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आज कमळ हातात घेऊन कमाल करुन दाखवली ही घटना वरवर सोपी वाटत असली तरी तीतकी सोपी देखील नाही  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांचे नाव दिल्लीतुन उमेदवार म्हणून जाहीर करेल   राजकीय घडामोडीं मध्येही प्राजक्त तनपुरे यांची भूमिका गेल्या...

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी उमेदवादी नामनिर्देशनपत्र दाखल

Image
नगराध्यक्ष करण ससाणे यांना अहिल्यानगर विधान परिषदचे उमेदवारी  श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील जागावाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसकडून करण ससाणे यांनाच अधिकृत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेला त्यांचा संपर्क, नगराध्यक्ष म्हणून केलेले काम आणि काँग्रेसमधील वाढता प्रभाव यामुळे त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. दरम्यान, महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आले आहे. तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, शनिवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाज...

नगरच्या साखर लाॅबीवर "देवाभाऊ" ची गोड कृप्रा !

Image
नगर जिल्ह्यातील साखर लॉबीवर ‘देवाभाऊं’ची गोड कृपा? राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे  यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील साखर लॉबी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी पूर्वी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे तथाकथित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात यांचे नाव चर्चेत आले होते. अशोक खरात यांच्याशी संबंधित काही कथित फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर त्यांच्या तथाकथित बुवाबाजीच्या साम्राज्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले गेले. यानंतर एसआयटी चौकशीसह विविध घटनांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. दर...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, ते  मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्राथमिक प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील चोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमात ते भाजपाचे सदस्य म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप प्रवेशानंतर दिल्ली येथील भाजप केंद्रीय कार्यालयातून प्राजक्त तनपुरे यांची अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडी व महायुतीच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बेकायदेशीर ड्रोन आणि चोरट्यांच्या दहशतीने झोपा उडाल्या

Image
बेकायदेशीर ड्रोन आणि चोरट्यांच्या दहशतीने  झोपा उडाल्या  ड्रोन।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात सध्या रात्रीच्या शांततेला भीतीची किनार लाभली आहे. रात्री आकाशात घिरट्या घालणारे संशयास्पद बेकायदेशीर ड्रोन, गावोगावी वाढलेला चोरट्यांचा वावर आणि प्रशासनाची संथ भूमिका यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत फिरणारे ड्रोन नेमके कोण उडवत आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, आणि प्रशासन अद्याप निष्क्रिय का आहे, असे अनेक प्रश्न आता नागरिकां मध्ये चर्चीले जात  आहेत. रात्रीच्या वेळी गावांच्या परिसरात, शेतभागात आणि वस्तींच्या वरून फिरणारे ड्रोन नागरिकांच्या भीतीत अधिक भर टाकत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी हे ड्रोन प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी ड्रोनच्या आवाजामुळे लोक रात्री घराबाहेर पडत आहेत, तर काही गावांमध्ये महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. आधीच वाढत्या चोरी, घरफोड्या आणि संशयास्पद हालचालींमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या मनात आता “या ड्रोनचा आणि चोरट्यांचा काही ...

नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा

Image
नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांनी एका प्रकरणात मदत करण्यासाठी 1लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मामासह 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या प्रकरणात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तडजोडीनंतर 1 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात? राहुरी।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर च्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली असून  माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. येत्या ३० मे रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय विश्वासू सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अलिकडेच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीतील प्रचारसभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे नाव घेत त्यांचे आभार मानले होते. त्या भाषणानंतर तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला होता. दरम्यान, प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष...

बेकायदेशीर ड्रोन प्रश्नी राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष नागरिकांत संताप

Image
बेकायदेशीर ड्रोनप्रश्नी राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप, भीतीचे सावट ड्रोन।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी रात्री उशिरापर्यंत घिरट्या घालणारे ड्रोन, वाढत्या चोरीच्या घटना, घरांचे दरवाजे ठोठावून दहशत निर्माण करणारे अज्ञात टोळके आणि त्याचवेळी स्थानिक पोलिसांची दिसणारी उदासीन भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा विषय केवळ अफवा किंवा सामान्य तक्रारींचा नसून थेट कायदा-सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्या काळोखात संशयास्पद ड्रोन फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हे ड्रोन केवळ मनोरंजनासाठी किंवा छायाचित्रणासाठी वापरले जात नसून, परिसराची पाहणी, घरांची रेकी किंवा गुन्हेगारी हालचालींसाठी त्यांचा वापर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी घरांचे दरवाजे वाजवणे, ...

अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

Image
‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संगीता मालकर यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्नेह सत्कार करण्यात आला. शहर बँकेचे उपाध्यक्ष तथा श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते स्नेह गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस  , पत्रकार शिवाजी घाडगे, कारभारी गरड, चंद्रकांत सोनार उपस्थित होते.  संगीता मालकर यांना श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. माणिक विधाते म्हणाले की संगीता मालकर या महिला सक्षमीकरणासाठी निस्वार्थ भावनेने सातत्याने कार्य करत आहेत. त्या केवळ शिक्षिका नसून समाजातील वंचित, गरजू आणि एकल महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ हा केवळ स...

रात्रीच्या ड्रोनची दहशत व प्रशासनाची कसोटी?

Image
ड्रोनची दहशत आणि प्रशासनाची कसोटी? ड्रोन ।शिवाजी घाडगे  राहुरी परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या संशयित ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे आधीच अस्वस्थ असलेल्या नागरिकांच्या चिंतेत या ड्रोनच्या वावरामुळे अधिक भर पडली आहे. ग्रामीण भागात रात्री अपरात्री आकाशात फिरणारे ड्रोन नेमके कोणाचे, कोणत्या उद्देशाने उडवले जात आहेत आणि त्यामागे काही गैरप्रकार तर नाहीत ना, असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत. तंत्रज्ञान हे विकासाचे साधन असले तरी त्याचा गैरवापर होऊ लागला तर तेच तंत्रज्ञान समाजासाठी धोकादायक ठरू शकते. ड्रोनचा वापर शेती, छायाचित्रण, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक सकारात्मक कामांसाठी होत असला तरी त्याचा बेकायदेशीर वापर रोखणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांना कोणताही पूर्वानुभव नसताना रात्रीच्या अंधारात ड्रोन फिरताना दिसल्यास भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे. राहुरी परिसरातील काही भागांत चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चा सुरू आहेत....

बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाई करा

Image
बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाईची मागणी.. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. राहुरी। राहुरी तालुका व परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस आणि पत्रकार शिवाजी घाडगे यांनी मंगळवार दि. २६ मे रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची संयुक्तरित्या भेट घेऊन अवैध ड्रोनच्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर चिंता व्यक्त करून कारवाईची मागणी केली.       यावेळी शिष्टमंडळाने राहुरी तालुक्यात अलीकडे रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. काही भागांमध्ये चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, या प्रक...

राहुरीला मिळणार आणखी एक आमदार?

Image
राहुरीला मिळणार आणखी एक आमदार? राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव व राहुरी हे राजकारणात अतिशय जागृत तालुके आहेत कोपरगावला दोन आमदार झाले तसे राहुरीला ही दोन आमदार मिळणार अलिकडेच आमदार अक्षय कर्डीले अलिकडेच राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत भाजपाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील राहुरीला उमेदवारी मिळु शकते फक्त उमेदवार प्राजक्त तनपुरे की सत्यजित कदम हा विषय कदाचित राहुरीला उमेदवारी मिळाली तर कोपरगाव प्रमाणे राहुरीला देखील दोन आमदार मिळु शकतात व फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करु शकतात अशी राजकीय चर्चा आहे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांतील संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला आहे. विशेषतः राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, ते भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या मा...

विधानसभेचे संभापती प्रा राम शिंदे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या निवासस्थानी

Image
देवळाली प्रवरात कदम निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण घाडगे न्यूज। प्रतिनिधी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी रात्री सुमारे नऊ  वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आगामी विधान परिषद निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रा. राम शिंदे यांच्या या भेटीकडे संभाव्य राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील भाजप नेतृत्वात प्रा. राम शिंदे यांचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याने, कदम कुटुंबाला पक्षाची साथ मिळाल्यास सत्यजित कदम या...

झुरळांची भाषा तरुणांचा संताप

Image
झुरळांची भाषा आणि तरुणांचा संताप उद्रेक । शिवाजी घाडगे देशात सध्या सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” अर्थात सीजीपीची जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विनोद, उपरोध आणि ट्रोलिंगचा भाग वाटणारी ही संकल्पना आता व्यवस्थेविरोधातील असंतोषाचे प्रतीक बनताना दिसत आहे. काही दिवसांतच लाखो युवक या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा होत आहे. हे केवळ सोशल मीडियावरील आणखी एक ट्रेंड म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे नाही; तर देशातील तरुणांच्या मनात साचलेल्या नाराजीचा हा उद्रेक प्रगट होताना दिसत असला तरी यांच्या भाई सगळेच झुरळ आहेत . एका कथित वक्तव्यात बेरोजगार तरुणांना “झुरळां”ची उपमा देण्यात आल्याचा आरोप झाला आणि त्यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. “जर सारी झुरळे एकत्र आली तर?” या प्रश्नातून सीजीपीचा जन्म झाला. या संपूर्ण आंदोलनात विनोद आहे, उपहास आहे; पण त्यामागे दडलेली वेदना अधिक मोठी आहे. कारण हा रोष केवळ एखाद्या व्यक्तीविरोधात नाही, तर संपूर्ण व्यवस्थेविरोधात आहे. सध्या सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” (सीजीपी) या नव्याने समोर आलेल्या संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसांत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेने येत आहेत शिर्डीला

Image
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  रेल्वेत बसले शिर्डी येतात  घाडगे न्यूज। प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी शिर्डी येथे होणाऱ्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रेल्वेने रवाना झाले आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून पहाटे ५.५० वाजता त्यांनी रेल्वेने शिर्डीकडे प्रस्थान केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री शिर्डीतील कार्यक्रमानंतर सायंकाळी नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे साधेपणा आणि खर्च बचतीचा संदेश दिला जात असला, तरी दुसरीकडे शिर्डीतील संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य विधान परिषद ची आचार संहिता देखील लागु आहे.  विशेषतः कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाण...

विधानपरिषदे साठी कदम कदम बढाते जाये

Image
विधानपरिषदे साठी कदम कदम बढाते जाये  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पक्ष लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून इच्छुक उमेदवारांनीही पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या निवडणुकीसाठी सक्रिय भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगू लागली आहे. जिल्ह्यात भाजपाच्या एकनिष्ठ आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला विधान परिषदेत संधी मिळावी, अशी भावना पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उमेदवारीसाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर उद्योजक जगदीश कदम यांनीही पक्षातील संबंध अधिक दृढ करत विविध स्तरांव...

महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या यंत्राला पेटेंट

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि यंत्राला पेटंट राहुरी । प्रतिनिधी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या कृषि यंत्राला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यंत्राच्या संशोधनामध्ये अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड यांच्यासह डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि इंजि. रोहित गेठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सदर यंत्र ५५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे सहज चालवता येते. स्पेड नांगर व तव्याच्या कुळवाच्या एकत्रित मशागतीद्वारे पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते. या यंत्राच्या वापरामुळे मशागतीसाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्हीमध्ये बचत होते. एका तासात सुमारे ०.३३ हेक्टर क्षेत्रावर मशागत करता येते. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुल...

बोगस डॉक्टर चा गुण पदवी मौनात?

Image
बोगस डॉक्टरचा “गुण” आणि पदवी मौनात !  काहूर।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात नुकत्याच घडलेल्या एका कारवाईने संपूर्ण परिसरात चर्चेचे वादळ उठवले आहे. एका निसर्गोपचार केंद्रावर प्रशासनाने धाड टाकत संबंधित डॉक्टरला अटक केली आणि तो “बोगस” असल्याचा ठपका ठेवत थेट जेलची हवा दाखवली. कायद्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्यच असेल; पण या घटनेनंतर गावागावात, चौकाचौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर एक उपहासात्मक पण बोचरा प्रश्न चर्चिला जात आहे  “जर तो इतकाच बोगस होता, तर त्याच्याकडे रोज शंभरहून अधिक रुग्ण उपचारासाठी का जात होते?” हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच तो उपरोधिक भाष्य करणारा ठरत आहे. कारण लाखो रुपये खर्च करून पदव्या घेणारे, इंग्रजीत प्रिस्क्रिप्शन लिहिणारे आणि क्लिनिकच्या बोर्डावर नावामागे दहा-दहा अक्षरे लावणारे अनेक “अधिकृत” डॉक्टर रुग्णांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरत असताना, एका गावाकडच्या उपचारकाकडे एवढी गर्दी का होत होती? काही जण तर उपहासाने म्हणू लागले आहेत, “हे काय लातूर पॅटर्नचे विद्यार्थी होते का? परीक्षा पास झाल्या; पण रुग...

श्रध्देच्या भुमीत राष्ट्र सुरक्षतेची नवी ताकत

Image
श्रद्धेच्या भूमीत राष्ट्रसुरक्षेची नवी ताकद संवाद । शिवाजी घाडगे एकेकाळी जगाला “श्रद्धा आणि सबुरी” हा शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आता राष्ट्रसुरक्षेच्या सामर्थ्याची नवी पहाट उगवत आहे. अध्यात्म, भक्ती आणि मानवतेची ओळख असलेल्या या पावन भूमीत डिफेन्स हब उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ही केवळ औद्योगिक घटना नाही तर बदलत्या भारताच्या नव्या शक्तीची घोषणा आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सीमारेषेवर फक्त सैनिक उभे करून युद्ध जिंकता येत नाही; त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी शस्त्रनिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता अत्यावश्यक बनली आहे. अशा वेळी शिर्डीसारख्या धार्मिक आणि ग्रामीण भागात अत्याधुनिक तोफगोळे, रॉकेट, मिसाईल आणि ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभा राहणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह  यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणे, हेही या उपक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे आहे. एकेकाळी केवळ भक्तीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीची आता संरक्षण उत्पादन क्षेत्रात...

उघड्यावर संसार रणरणत्या उन्हात वाट सरेना

Image
उघड्यावर थाटलेला संसार  रणरणत्या उन्हात ....  बिकटवाट ।शिवाजी घाडगे   माता-माऊलींची अंत:करण हेलावून टाकणारी वाटचाल आभाळातून आग बरसत आहे… संध्याकाळचा सूर्यही जणू अंगावर निखारे फेकत आहे. तापमानाने ४३ अंशांचा टप्पा पार केला आहे. रस्त्यावरच्या डांबरालाही चटके बसत आहेत. माणूस दोन पावले चालला तरी जीव घाबरून जातो. अशा जीवघेण्या उन्हातही काही जीव मात्र थांबत नाहीत… कारण त्यांना थांबण्याची परवानगीच नसते! गुरुवारी असेच काळजाला चिरून जाणारे दृश्य पाहायला मिळाले. दोन धनगर माता-माऊली… अंगावर उन्हाचा तडाखा, पायाखाली तापलेली जमीन आणि डोक्यावर संपूर्ण संसार! कुणाच्या शिंगरावर उघड्या प्रपंचाचा बाडाबिस्तरा बांधलेला, तर कुणाच्या घोड्याच्या पाठीवर संसाराचे गाठोडे लटकलेले… मागे लेकरांची ओढ, पुढे मेंढ्यांचा कळप आणि मधोमध जगण्यासाठी सुरू असलेली अंतहीन फरफट! मेंढ्यांचे खांड घेऊन कुंकवाचा धनी, दिर आणि घरातील पुरुष मंडळी चराईच्या शोधात पुढे निघून गेली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या माता-माऊली चालत आहेत… ना डोक्यावर छप्पर, ना विसाव्यासाठी झाडाची सावली, ना थंड पाण्याचा घोट! फक...

रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील

Image

जप्त केलेल्या अंमली पदार्थ चोरीला वेगळे वळण वळणचे डाॅक्टर विजय मकासरे यांचा सरळ आरोप

Image
जप्त अमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला नवे वळण; स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांवर वळणचे  डाॅक्टर विजय मकासरे यांचे गंभीर आरोप घाडगे न्यूज।प्रतिनिधी   जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या चोरी व विक्री प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या भूमिकेची नव्याने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी डाॅक्टर विजय मकासरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या कडे   तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की   सरकारी मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असतानाही त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुद्देमाल कक्षाची नियमित तपासणी, नोंदवही पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अनेक त्रुटी...

मेडल्सचा बादशहा रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील

Image
 मेडल्सचा बादशहा : रायडिंगचा पाटील शरद काळे  पाटील  साहस।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर येथील साहस, वेग आणि जिद्दीच्या जोरावर मोटारसायकल रेसिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे शरद काळे पाटील हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या  भेटी दरम्यान कार्यालयाच्या भिंतींवर झळकणाऱ्या विविध स्पर्धांतील विजयाची खुन मिरवणाऱ्या मेडल्स आणि सन्मानचिन्हांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक मेडलमागे संघर्ष, मेहनत आणि धाडसाची एक वेगळी कहाणी दडलेली असल्याचे जाणवत होते. दुचाकी रेसिंग हा अत्यंत धोकादायक आणि साहसी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र, शरद काळे पाटील यांनी आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रेसिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. त्यामुळे त्यांना “मेडल्सचा बादशहा” अशी ओळख मिळाली आहे. शरद काळे पाटील यांच्या वेगाबाबत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या १ तास २० मिनिटां...

कोठे नेवून ठेवली ही व्यवस्था?

Image
कुठे नेऊन ठेवली आहे ही व्यवस्था? तरंग।शिवाजी घाडगे  राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बनत चालली आहे. शहरांतील अनेक सोसायट्यांमध्ये बारा-बारा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. मग ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला किती अंधार येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. एकीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा, तर दुसरीकडे पाणी आणि वीजटंचाईने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यातील भीषण पाणी संकटाची चाहूल आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असताना इंधन तुटवड्याची भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस टंचाई इतकी तीव्र झाली आहे की काही मोठ्या हॉटेल्सनाही चुली पेटवण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे नव्हे, तर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत देणारी आहे. महागाईचा भडका इतका वाढला आहे की सामान्य माणसाच्या हाता...

१८जुन रोजी स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदान २२ निकाल -डाॅ पंकज आशिया

Image
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक  मतदारसंघ  १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी ४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज।प्रतिनिधी  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारांना १ जूनपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असून, २ जून...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 25 लाखाचे पारितोषिक

Image
पुणे कृषि हॅकथॉन 2026 मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाला 25 लाखांचे प्रथम पारितोषिक कृषि विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पुणे कृषि हॅकथॉन 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या संवेदक आधारित ताण विशिष्ट नत्र फवारणी यंत्र या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ङङदेवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रुपये 25 लाखाचे कृषि यांत्रिकीकरण या विषयांतर्गत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे सदस्य डॉ. अवधूत वाळुंज यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे आणि इंजि. भूमिका पांडे हे या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे अन्य सदस्य असून हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी काम पाहिले. या प्रयोग...