माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून, ते मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्राथमिक प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील चोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमात ते भाजपाचे सदस्य म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप प्रवेशानंतर दिल्ली येथील भाजप केंद्रीय कार्यालयातून प्राजक्त तनपुरे यांची अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडी व महायुतीच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment