चिंचविहिरे येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
चिंचविहिरे येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन घाडगे न्यूज। प्रतिनिधी चिंचविहिरे गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीनारायण देवता यांच्या कृपाशीर्वादाने गावात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांचा जागर घडविणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा शनिवारी भक्तिमय वातावरणात सुरु होत असून. या सप्ताहाच्या निमित्ताने चिंचविहिरेसह पंचक्रोशीतील भाविकांना अध्यात्मिक पर्वणी लाभणार असून, संपूर्ण गाव व परिस्थितीत गावे हरिनामाच्या गजराने आणि ज्ञानेश्वरीच्या पवित्र वाचनाने दुमदुमून जाणार आहे. सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त शनिवारी सकाळी ११ वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदशास्त्रसंपन्न गुरुवर्य प्रवीण नवले गुरुजी यांच्या मंत्रोच्चार आणि विधिवत पूजाविधीने श्री लक्ष्मीनारायण भगवंतांचा अभिषेक करण्यात येणार आहे. विविध धार्मिक विधी आणि मंत्रोपचारांनी अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासह अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायणाची आध्यात्मिक परंपरा संतश्रेष्ठ ...