Posts

Showing posts with the label विधानपरिषद

भाजपाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोध गुलाल?

Image
भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोधचा गुलाल? घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष करण ससाणे आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. उर्वरित उमेदवार कमलेश गांधी आणि दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दोन्ही उमेदवारांनीही माघार घेतल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होईल. त्यामुळे विधान परिषदेत अहिल्यानगरचे खाते प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने उघडले जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  यांच्यावर अहिल्यानगर जागेची जबाबदारी सोपविली होती. स्थानिक पातळीवरील समन्वय साधत त्य...