कृषीपर्व कृषी प्रदर्शन ५ ते ९ अहिल्यानगर मध्ये
‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारीला अहिल्यानगर मध्ये घाडगे न्यूज | प्रतिनिधी कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ तसेच कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन करणे तसेच थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्या समन्वयातून हा उ...