अक्षय कमळाच्या विजयात दडली जबादारीची जाणीव
अक्षय कमळाच्या विजयात दडलेली जबाबदारीची जाणीव राजरंग।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरता मर्यादित नाही, तर तो स्थानिक राजकारणातील भावनिक लाट, पक्षनिष्ठा आणि वारशाच्या सातत्याचा महत्त्वाचा दाखला ठरला आहे. आमदार अक्षय कर्डीले यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा भाजपासाठी गड कायम राखणारा ठरला, पण त्यामागे असलेल्या भावना आwwwwwww1wwqq1qqqwswwwणि वास्तव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी अजून भरून निघालेली नाही. त्यांनी उभारलेली राजकीय ताकद, मतदारांशी असलेला जिव्हाळा आणि विकासकामांची परंपरा यामुळेच राहुरीत ‘कमळ’ पुन्हा फुलले होते. त्याच वारशाची धुरा आता त्यांच्या पुत्राच्या खांद्यावर आली आहे. मात्र, वारसा मिळवणे जितके सोपे दिसते, तितके तो टिकवणे कठीण असते हे वास्तव नव्या आमदारांसमोर उभे आहे. या निवडणुकीत सहानुभूतीची लाट, पक्षयंत्रणेची ताकद आणि राज्य-केंद्रातील सत्तेचा प्रभाव हे सर्व घटक अक्षय कर्डीले यांच्या बाजूने होते. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेच...