Posts

Showing posts with the label संशोधन सुरूच आहे

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला भेट

Image
डॉ. तानाजी नरूटे यांची पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला भेट महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पाडेगाव, ता. फलटण येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरूटे यांनी भेट दिली. यावेळी ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या 16 वाणांची माहिती देवून या वाणाचे देशासाठी आणि राज्यासाठी असलेले योगदान विषद केले. जिल्हा विस्तार केंद्राचेप्रभारी अधिकारी प्रा. गांगुर्डे यांनी विस्तार विषयक कार्यक्रमाची माहिती सादर केली. यावेळी डॉ. तानाजी नरूटे यांनी या केंद्राला देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार तसेच सन 2022 या वर्षीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.  या वेळी संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगांना, ऊस बेणे मळयास तसेच या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणांच्या प्लॉटला त्यांनी भेट दिली. विशेष करून त्यांनी चाबुक काणी व ग...