आम जनतेला शासकी योजनाचा फायदा मिळवून द्या-माजी मंत्री शिवाजी कर्डीले
आम जनतेला विविध शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठीच मंत्री काम करावे -माजी शिवाजी कर्डिले गुहा येथील अनाथ छात्रालयातील ३१ विद्यार्थ्यांसह १५१ लाभार्थ्यांना मिळाला लाभ; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण - संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी समिती सदस्यांनी काम करावे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत गेल्या तर नक्कीच समाधान मिळते असे प्रतिपादन माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केले. गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुमारे ३१ अनाथ विद्यार्थ्यांना व इतर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ, तहसीलदार चंद्रजीत राजपुत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, के.मा.कोळसे, बबन कोळसे, भैय्या शेळके, समितीचे सदस्य सरपंच सर्जेराव घाडगे, नारायण धनवट, अजित डावखर, अविनाश बाचकर, दिपक वाबळे, गोरख अडसुरे, संदीप आढाव, किर...