Posts

Showing posts from June, 2026

घरकुला साठी 20 हजाराची तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Image
घरकुल मंजुरीसाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध गुन्हा घाडगे न्यूज | प्रतिनिधी सात्रळ येथे घरकुल योजनेचे पैसे मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हैदर याकुब पटेल (वय ५६), ग्रामविकास अधिकारी, सात्रळ ग्रामपंचायत, रा. वृंदावन कॉलनी, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, ज्ञानदेव मोहन डुकरे, लिपिक, रा. सात्रळ, तसेच सचिन हौशिबा ब्राम्हणे, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती राहुरी, रा. लोणी, ता. राहाता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. कारवाईनंतर हैदर पटेल आणि ज्ञानदेव डुकरे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, कोणताही लो...

आमदार सचिन आहेर शिदे सेनेकडे

Image
आमदार सचिन आहेर शिंदे सेनेत  राजरंग।शिवाजी घाडगे  ठाकरेंना धक्क्यावर धक्के पक्षातील गळती थांबणार कधी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेकदा "निष्ठावंत आमच्यासोबत आहेत" असा दावा केला. मात्र प्रत्यक्ष राजकीय वास्तव काही वेगळेच चित्र दाखवत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली गळती आज पर्यत थांबण्याचे नाव घेत नाही. खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते सातत्याने ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचे दिसत आहे. अलिकडेच सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा सुरू असतानाच आता आमदार सचिन आहेर यांच्या उपसभापतीपदाच्या अर्जामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे. सचिन आहेर हे केवळ आमदार नसून कामगार चळवळीशी जोडलेले आणि संघटनात्मक पातळीवर प्रभाव असलेले नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांची भूमिका बदलणे हा केवळ एका आमदाराचा निर्णय नसून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसाठीही धक्का मानला जात आहे. प्रश्न असा आहे की, पक्षातून होणारी ही सततची गळती केवळ सत्तेच्या मोहामुळे होत आहे का, की पक्षांतर्गत संवाद आणि ...

शिक्षक पात्रता परिक्षेची गरज आहे

Image
शिक्षक प्रात्रता परीक्षेची गरज आहे  तरंग।शिवाजी घाडगे  शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकांची निवड गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. याच उद्देशाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची संकल्पना पुढे आली.  मुळात आगोदर जे अभ्यासक्रम आहेत ते पुर्ण करताना परिपूर्ण ज्ञान दिलेले असतेच मग पुन्हा टी ई टी कशा साठी घ्यायची व यात नेमक कोणाच भल होते एक तर गेले अनेक दिवसांपासून शिक्षक भरले गेले नाहीत त्याचा परिणाम विद्यार्थाच्या शिकवण्यावर होतो  मात्र अलीकडे उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारानंतर या परीक्षेच्या विश्वासार्हतेबरोबरच तिच्या उपयुक्ततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टीईटीची प्रश्नपत्रिका फुटते, परीक्षा रद्द होते, चौकशा सुरू होतात, आरोपी अटक होतात आणि काही दिवसांत सर्व काही शांत होते. मात्र या सगळ्या गोंधळात लाखो उमेदवारांचे काय? अनेक वर्षे अभ्यास करून, आर्थिक अडचणींवर मात करून आणि शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून परीक...

हा खाऊसाहेब तिकडे गेलाय बट्याबोळ

Image
हा ‘खाऊसाहेब’ जिकडे गेला तिकडे बट्ट्याबोळ!    घाडगे न्यूज | प्रतिनिधी | शिर्डी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करताना त्यांचा उल्लेख "खाऊसाहेब" असा केला. सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम पक्षांतर्गतच सुरू आहे. महिलांच्या आरक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळूनही अशा घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रातील राजकारणावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळू नये यासाठी काहीजण खासदार फोडण्याचे काम करत...

गुणवंतांचा सत्कार की मानापानाचे राजकीय नाट्य

Image
गुणवंतांचा सत्कार की मानपानाचे राजकीय नाट्य ?  तरंग।शिवाजी घाडगे  अलीकडेच एका कार्यक्रमात खासदार मेघा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात आसनव्यवस्थेवरून झालेल्या वादाची राज्यभर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत मराठा समाजातील तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तरुणांच्या यशाचा सन्मान करणे हा होता. मात्र, कार्यक्रमात घडलेल्या घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू गुणवंत विद्यार्थी न राहता राजकीय मानपानाचा वाद ठरला. कार्यक्रमासाठी खासदार मेघा कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांना पहिल्या रांगेत बसवून नंतर जागेवरून उठविण्याऐवजी थेट व्यासपीठावर स्थान देणे अधिक उचित ठरले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कारण त्या लोकप्रतिनिधी असून संसदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवर खासदार आहेत. विशेष म्हणजे त्या पक्षनिष्ठ आणि सक्रिय महिला नेत्या म्हणूनही ओळखल्या जातात. वादाच्या वेळी खासदार मेघा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना, "तुम्ही आता मुख्यमंत्री देवेंद...

रावसाहेब खेवरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

Image
ब्रेकिंग न्यूज माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा शिंदे गटात प्रवेश; रविवारी मुंबईत होणार पक्षप्रवेश जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतर नाराज असलेले खेवरे अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करणार ‘जय महाराष्ट्र’ घाडगे न्यूज| प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हे रविवारी दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर रावसाहेब खेवरे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. रावसाहेब खेवरे यांनी अलिकडेच राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. राहुरी तालुक्यासह शिर्डी लोकसभा मतदा...

प्रभु रामाचा वनवास संपायला तयार नाही श्रध्देचा बाजार तेजीत

Image
प्रभु रामाचा वनवास अजुन संपायला तयार नाही श्रध्देचा बाजार तेजीत   भक्ती।शिवाजी घाडगे  प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांचा संपूर्ण प्रवास संघर्ष, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा होता. चौदा वर्षांचा वनवास भोगताना त्यांनी सीतेसह वनवासी जीवन स्वीकारले. अन्यायाविरुद्ध लढा देत धर्म आणि मर्यादेचे पालन केले. परंतु आजच्या काळात रामाच्या नावाने उभारलेल्या व्यवस्थांमध्ये जे काही घडताना दिसत आहे, ते पाहता रामाचा वनवास जणू अद्यापही संपलेला नाही, असेच वाटते. अयोध्येतील राममंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिर उभारणीसाठी अनेक वर्षे संघर्ष झाला. या आंदोलनात अनेक कारसेवकांनी आपले प्राण गमावले. लाखो भाविकांनी आर्थिक मदत केली. मात्र आता मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या रक्कमेच्या आणि सोन्याच्या व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. दानातून आलेल्या पैशांची मोजणी आणि बँकेत जमा करण्याचे काम खासगी संस्थांकडून करून घेतले जात असल्याने पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या प्रकरणातील सत्य काय आहे, याचा निर्णय संबंधित यंत्रण...

विश्वास नागरे-पाटील यांच्या वक्तव्यावरून गैरविश्वासाची चर्चा

Image
विश्वास नागरे-पाटील यांच्या वक्तव्यावरून गैरविश्वासाची चर्चा तरंग।शिवाजी घाडगे  नागपुरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी नुकत्याच नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  एका कार्यक्रमात उपस्थित राहून संघाच्या कार्याचे कौतुक केल्याने विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर काहींनी समर्थन व्यक्त केले असून, तर काहींनी टीका केली आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विश्वास नागरे-पाटील हे राज्यातील अत्यंत अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान मानले जातात. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे मार्गदर्शनपर व्याख्याने देत असतात. विशेषतः गणेशोत्सव, युवक मेळावे आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची भाषणे मोठ्या उत्साहाने ऐकली जातात. अलीकडेच त्यांची मुंबईहून नागपूर येथे बदली झाली. त्यानंतर त्यांनी संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेत संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केल्याचे समोर आले. या पा...

शेती शाश्वत करणा साठी सर्वाचे प्रयत्न हवे

Image
शेती शाश्वत साठी सर्वांनीचे प्रयत्न हवे – कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज| प्रतिनिधी शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही माती परीक्षण न करता रासायनिक खतांचा वापर करतात. पिकांना दिलेले सर्व रासायनिक खत पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे जैविक व जिवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जिवाणू खते, सेंद्रिय खते तसेच हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर देऊन भरडधान्य पिकांचा समावेश करावा. मानवी आरोग्य आणि शेती यांची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शासनाचे विविध विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ आणि ‘संतुलित खत वापर जनजागृती अभियान’ अंत...

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डाॅक्टर अटकेत

Image
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डॉक्टरला अटक; आरोपींची संख्या 24 वर घाडगे न्यूज प्रतिनिधी :  अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा अतिशय बारकाईने तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक डॉक्टर, मेडिकल चालक तसेच एजंट यांचा या गैरप्रकारांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे धागेदोरे आता विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या डॉक्टर, एजंट आणि मेडिकल चालकांची चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक तपास केल्यानंतर विविध तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आता आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय 54 वर्षे), बीएएमएस, रा. शिरूर, जि. पुणे असे आहे. सदर डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्या...

लाभा साठी आम्ही पक्षच काय बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये

Image
लाभा साठी आम्ही पक्ष काय  बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये  राजरंग।शिवाजी घाडगे  लोकशाहीत पत्रकार प्रश्न विचारतात आणि लोकप्रतिनिधी उत्तरे देतात. पण हल्ली काही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे म्हणजे जणू त्यांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी केल्यासारखे वाटू लागले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी काही पत्रकारांना उद्देशून वापरलेली भाषा आणि व्यक्त केलेला संताप यामुळे पुन्हा एकदा राजकारणी आणि माध्यमांमधील नाते चर्चेत आले आहे. "मी आता काही बोलणार नाही", "उगाच बोट घालू नका", "माझ्या डोक्यात जाऊ नका", "कमिशनरकडे तक्रार करा" अशा शब्दांत खासदारांनी पत्रकारांना झापले. प्रश्न एवढाच आहे की, पत्रकारांनी नेमके काय अपराध केले होते? प्रश्न विचारला होता की गुन्हा केला होता? पक्ष बदरण्याचा गुन्हा तुम्ही करा आणि म्हणता घरा पर्यंत जावु नका मी पाटील  काय बी करीन म्हणजे आम्ही लाभा साठी पक्षच काय  बापाचे नाव बदलु राजकारणात पक्ष बदलणे आता नवीन राहिलेले नाही. कालपर्यंत ज्या पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्याच पक्षावर दुसऱ्या दिवशी टीका क...

सत्तेत जाणच शाहणपणाच

Image
सत्तेत जाणच शाहणपणाच  राजरंग।शिवाजी घाडगे  सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल कोणाला काय वाटत कोण काय  म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची? शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व  नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले  पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही....

महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षक झाले आता डी वाय एस पी

Image
महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनाही बढती घाडगे न्यूज @प्रतिनिधी  महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत. या पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले प्रमोद सदाशिव वाघ यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अ...

इंडीयाच्या विकासा साठी भारताचा त्याग

Image
इंडियाच्या विकासासाठी भारताचा त्याग का? तरंग।शिवाजी घाडगे  देशाचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा विषय असतो. आधुनिक महामार्ग, बुलेट ट्रेन, मोठी धरणे, औद्योगिक प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि स्मार्ट शहरे ही प्रगतीची प्रतीके मानली जातात. परंतु या विकासाच्या चमकदार चित्रामागे एक मूलभूत प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो या विकासाची किंमत नेमकी कोण मोजत आहे? ग्रामीण आणि शहरी म्हणजे शहराचा विकासा साठी त्याग कोण करतय? चार, सहा किंवा दहा पदरी महामार्ग उभे राहताना हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाते. बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. धरणांसाठी संपूर्ण गावे पाण्याखाली जातात. औष्णिक वीज प्रकल्पांसाठी जंगलांचा बळी दिला जातो आणि आदिवासींना त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडावे लागते. किनारपट्टीवरील प्रकल्पांसाठी मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. प्रत्येक वेळी एकच युक्तिवाद पुढे केला जातो देशाच्या विकासासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो. हा युक्तिवाद चुकीचा नाही. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीस...

नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले

Image
नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले   ‘राजकीय विमा’ फसला? राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकारणाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. राजकारणात पैसा, सत्ता, पद आणि प्रस्थ यांना महत्त्व असले तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हातातच असतो. अनेकदा निवडणुकीपूर्वी आखलेली गणिते, बांधलेली समीकरणे आणि केलेल्या राजकीय गुंतवणुकीवर नेतेमंडळींचा प्रचंड विश्वास असतो. मात्र निकाल लागल्यानंतर वास्तव काहीसे वेगळेच चित्र दाखवून जाते. नाशिकमध्ये नेमके तेच घडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला नसला तरी पाठींबा देऊन प्राचार थाबवण्या साठी हार घातला यातीलच फुले वाटुन गोकुळ गिते यांनी दराडे यांची हार करत विधानपरिषदेत पोहचले असून मंगळवारी त्यानी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. कदाचित नरेंद्र दराडे यांचा भविष्यात रोष रोखण्या साठी गोकुळ गिते यांनी सेनेचे गित गायले असावे अशी चर्चा आहे.  शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा झालेला प...

दिल्लीत वाढते शिंदेंचे वजन

Image
दिल्लीत वाढते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वजन राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते राजकीय महत्त्व. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील सभेत "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे" असे जाहीरपणे सांगितल्यानंतर या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षांपेक्षा हे संख्याबळ अधिक असल्याने केंद्रातील सत्तासमीकरणात शिंदे यांचे महत्त्व वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या वाढत्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वास्तव वेगळेच प्रश्न उपस्थित करत आहे. एका बाजूला दिल्लीत शिंदे यांचा गौरव होत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होतो. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून महायुतीतील अंतर्गत राजकारणाचे संकेत देणारा मानला जात आहे. भाजपने मन...

नाशकात अपक्ष गोकुळ गिते विजयी ; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह

Image
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली होती. अखेर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिते यांना सुमारे ३५७ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) समर्थित महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाही त्यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हा पराभव दराडे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरही मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असताना पराभव कसा झाला, याचे आत्मपरीक्षण आता संबंधित पक्षांना क...

कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल....

Image
 कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात यश अचानक मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन, संघटन बांधणी, जनसंपर्क आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. परीक्षेत अव्वल येणारा विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करतो, त्याचप्रमाणे राजकारणातील मोठी पदे मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नेतेही अनेक वर्षे आधीपासूनच आपली रणनीती आखत असतात. त्यामुळे एखादा नेता धार्मिक स्थळांना भेट देतो, जनसंपर्क वाढवतो किंवा आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यामागे केवळ श्रद्धा नसून राजकीय संदेशही दडलेला असतो. नुकतीच कोल्हापुरात महालक्ष्मीची ओटी भरल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सत्तेतील एका प्रभावशाली मंत्र्याने आगामी २०२९ च्या राजकीय समीकरणांचा विचार करून आतापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकारणातील प्रत्येक हालचालीचे अर्थ शोधले जात असताना या धार्मिक भेटीकडेही अनेकजण राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. गेल्या दशकात देशाच्या राजकारणात एका नेतृत्वाभोवती निर्माण...

शब्दांची मशाल हाती घेत शिवसेनेची मशागत करणारे दंगलकार कवी चंदनशिवे

Image
शब्दांची मशाल हाती घेत शिवसेनेची मशागत करणारे कवी नितीन चंदनशिवे राजरंग।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिन सोहळ्यात आपल्या प्रभावी आणि रोखठोक भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून टाकणारे कवी नितीन चंदनशिवे हे सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, एका क्षणात ते राज्यभरातील शिवसैनिकांसह सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चंदनशिवे यांच्या भाषणातील शब्दांमध्ये केवळ आक्रमकता नव्हती, तर शिवसेनेच्या विचारधारेबद्दलची निष्ठा, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील भावनिक जिव्हाळाही प्रकर्षाने दिसून आला. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेला विचारांचा वारसा, पत्नीच्या निधनानंतरही तिचा फोटो जवळ बाळगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा संवेदनशील पैलू आणि कोरोना काळात सामान्य जनतेसाठी धावून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य त्यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. याचबरोबर त्यांनी युवा नेते आद...

टायगर हातात काय आहे मनात

Image
टायगर हातात काय आहे मनात  राजरंग।शिवाजी घाडगे अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. दक्षिणेचे खासदार निलेश लंके वाघासोबत फिरताना दिसले आणि राजकीय वर्तुळाला चर्चेचा नवा विषय मिळाला. राजकारणात काही गोष्टी बोलून सांगाव्या लागत नाहीत, त्या कृतीतून सांगितल्या जातात असे म्हटले जाते. त्यामुळे या व्हिडिओमागे नेमका संदेश काय, यावर तर्कवितर्कांचा बाजार भरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या "ऑपरेशन टायगर" हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांबाबत विविध चर्चा सुरू असताना खासदार लंके यांचा वाघासोबतचा व्हिडिओ समोर येणे हा निव्वळ योगायोग आहे की सूचक राजकीय इशारा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राजकारणात योगायोगांपेक्षा संकेतांना अधिक महत्त्व असते. आजच्या काळात विकासकामांपेक्षा फोटो, व्हिडिओ आणि प्रतिमा यांचीच अधिक चर्चा होताना दिसते. एखादा नेता मंदिरात गेला तर त्याचे राजकीय विश्लेषण होते, शेतात गेला तर त्याचा संदेश शोधला जातो आणि वाघासोबत दिसला तर त्यामागे राजकीय समीकरणे शोधली जातात. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा होणे स्वाभाविकच...

खासदार राजाभाऊ राजा वाजत गाजत स्वागत

Image
खासदार राजाभाऊ खऱ्या अर्थाने ‘राजा’ ठरले! वाजत गाजत स्वागत  राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात सत्तेची समीकरणे बदलत असतात. आज सत्ता असते, उद्या नसते. पदे, मंत्रीपदे, निधी आणि अधिकार यांचा मोह अनेकांना आपल्या विचारांपासून आणि मतदारांनी दिलेल्या विश्वासापासून दूर नेत असतो. अशा परिस्थितीत सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देणारे नेते समाजाच्या स्मरणात राहतात. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये घेतलेली भूमिका याच मूल्यांची आठवण करून देणारी ठरली आहे. ज्या विचार धारेतुन आपण निवडून आलो त्या विचार धारे बरोबर प्रामाणिक राहणाऱ्यांना शिवसैनिक काय जनता देखील आदर करते  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत पक्षांतर, गटबाजी आणि राजकीय सोयीसाठी बदलणाऱ्या भूमिका यांची मालिका सुरू आहे. अनेकांनी सत्तेच्या दिशेने वाटचाल केली, तर काहींनी आपल्या राजकीय भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. राजाभाऊ वाजे यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यामुळेच त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, फटाक्यांची आतषबाजी झाली, फुलांचा वर्षाव झाला आणि निष्ठेचा उत्स...

श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका तीन लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल

Image
श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका; तीन  लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल  घाठगे न्यूज।प्रतिनिधी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली असून, लाच मागितल्याच्या आरोपावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील कथित भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आला असून, ही केवळ तीन कर्मचाऱ्यांची बाब आहे की त्यामागे मोठी साखळी कार्यरत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी म्हणून नितीन अशोक गाडगे (वय ४४), राजेश रावसाहेब जाधव (वय ३८) आणि दादाराम शिवराम म्हस्के (वय ५६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या भावाच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, नंतर ही रक्कम ७ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या ...

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा

Image
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा? राजरंग।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदारांबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, तथाकथित "ऑपरेशन टायगर"मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही नाव घेतले जात आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळ स्पष्ट करेल, मात्र मतदारसंघात त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्या. एका निवडणुकीत त्यांनी ...