आमदार सचिन आहेर शिदे सेनेकडे
राजरंग।शिवाजी घाडगे
ठाकरेंना धक्क्यावर धक्के पक्षातील गळती थांबणार कधी
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेकदा "निष्ठावंत आमच्यासोबत आहेत" असा दावा केला. मात्र प्रत्यक्ष राजकीय वास्तव काही वेगळेच चित्र दाखवत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली गळती आज पर्यत थांबण्याचे नाव घेत नाही. खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते सातत्याने ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचे दिसत आहे.
अलिकडेच सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा सुरू असतानाच आता आमदार सचिन आहेर यांच्या उपसभापतीपदाच्या अर्जामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे. सचिन आहेर हे केवळ आमदार नसून कामगार चळवळीशी जोडलेले आणि संघटनात्मक पातळीवर प्रभाव असलेले नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांची भूमिका बदलणे हा केवळ एका आमदाराचा निर्णय नसून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसाठीही धक्का मानला जात आहे.
प्रश्न असा आहे की, पक्षातून होणारी ही सततची गळती केवळ सत्तेच्या मोहामुळे होत आहे का, की पक्षांतर्गत संवाद आणि नेतृत्वशैलीत काहीतरी गंभीर त्रुटी आहेत? जर प्रत्येक निवडणुकीनंतर किंवा प्रत्येक मोठ्या राजकीय घडामोडीनंतर नेते पक्ष सोडत असतील, तर त्यामागील कारणांचा प्रामाणिकपणे शोध घेण्याची गरज आहे.
शिवसेनेची ओळख एकेकाळी आक्रमक संघटना, निष्ठावंत कार्यकर्ते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे होती. आज मात्र त्याच पक्षात नेत्यांचे पलायन सुरू आहे. कार्यकर्त्यांना भावनिक आवाहने करून काही काळ मनोबल टिकवता येईल; पण केवळ सहानुभूतीच्या आधारावर पक्ष उभा राहत नाही. त्यासाठी मजबूत संघटना, प्रभावी नेतृत्व आणि भविष्यासंदर्भातील स्पष्ट दिशा आवश्यक असते.
सत्तेत नसल्यामुळे अनेक नेते पक्ष सोडत आहेत, असे सांगून या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण पक्षातील प्रत्येक जाणारा नेता हा केवळ एक व्यक्ती नसतो; त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचा एक गट, स्थानिक जनाधार आणि राजकीय प्रभावही निघून जात असतो.
आज परिस्थिती अशी आहे की, ठाकरे गटाला विरोधकांशी लढण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील गळती रोखण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागत आहे. जर हेच चित्र कायम राहिले, तर आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते.
राजकारणात सहानुभूती महत्त्वाची असते, पण शेवटी जनाधार, संघटनशक्ती आणि नेतृत्वावरच पक्षाचे भविष्य ठरत असते. त्यामुळे ठाकरे गटाने आता आत्मपरीक्षण करून गळतीची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. अन्यथा धक्क्यांची ही मालिका थांबण्याऐवजी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
"राजकीय जाणकारांच्या मते, विधानसभा उपसभापती हे घटनात्मक पद असल्याने अशा पदांवर निवड झालेल्या सदस्यांबाबत पक्षांतरबंदी कायद्याच्या काही तरतुदी वेगळ्या प्रकारे लागू होतात. त्यामुळे या पदासाठीच्या उमेदवारीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे"
दरम्यान आता काही आमदार देखील उध्दव ठाकरे सेनेचे जाणार असल्याची चर्चा असून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा नंतर महाराष्ट्रात देखील मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत असून
Comments
Post a Comment