Posts

Showing posts with the label एम पी के व्ही संशोधन

दोन यंत्र आले पेटंट वर

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी यंत्रांना मिळाले पेटंट       महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्र व ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्र या दोन यंत्रांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केले आहे. या दोन यंत्रांच्या संशोधनात महत्वाचे योगदान देणारे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड तसेच त्यांचे सहकारी डॉ. रवीकिरण राठोड, डॉ. संजय भांगरे, इंजि. गोविंद काळे यांचे नांव पेटंट प्रमाणपत्रावर नमुद करण्यात आले आहे. सदरचे पेटंट मिळविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शन मिळाले.          विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्राची सरासरी तोडणी क्षमता 178 किलो प्रति तास असून लहान व सीमांत शेतकर्यांसाठी  उपयुक्त आहे. या यंत्राच्या...