प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड
प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे श्रीरामपूर येथील सद्य स्थिती तसेच जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलेली खंत श्रीरामपूर शहरांवर गुंडगिरी सावट रिपोर्ट वर मत व्यक्त करताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संपर्कात असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे निष्पक्ष पालन आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे अधिकाधिक कठीण बनत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही राजकीय शिफारशी आणि इतर अनौपचारिक बाबींना महत्त्व दिले जात आहे. अशा वातावरणात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता काम करतात, मात्र त्यांनाच अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या भावनांनुसार, अलीकडच्या काळात पोलीस दलातील काही...