उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हात बांधले!
उपमुख्यमंत्री शिंदेंचे हात बांधले! राजरंग । शिवाजी घाडगे ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बांधले आहेत’ असे म्हटले तर महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणभर खळबळ उडू शकते. विरोधकांना त्यात राजकीय अर्थ दिसेल, समर्थकांना टोला वाटेल आणि सर्वसामान्यांना नेमके काय झाले, असा प्रश्न पडेल. पण यावेळी गोष्ट वेगळी आहे. शिंदेंचे हात खरोखरच बांधले गेले आहेत; मात्र ते कोणत्याही राजकीय विरोधकाने नव्हे, तर बहिणीच्या प्रेमाच्या राख्यांनी! रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना नेत्या दीपाळी सय्यद यांच्या पुढाकाराने महिला शिवसेना आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधण्यात आल्या. महिला कार्यकर्त्यांनी बांधलेल्या असंख्य राख्यांमुळे शिंदेंचे दोन्ही हात अक्षरशः भरून गेले. राजकीय धावपळ, बैठका, दौरे, उद्घाटने आणि सत्तेच्या जबाबदाऱ्यांमध्ये रमलेल्या नेत्याच्या हातावर एकाच वेळी एवढ्या राख्या दिसणे हा निश्चितच भावनिक क्षण होता. पण राजकारणात एखादे छायाचित्रही कधी कधी हजार शब्द बोलून जाते. शिंदेंच्या राख्यांनी भरलेल्या हातांचे छायाचित्र पाहताना अनेक...