राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत कायदा व सुव्यस्था आबादीत ठेवा
राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी दिल्या. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे...