राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत कायदा व सुव्यस्था आबादीत ठेवा

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत  कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
     घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी  दिल्या.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे. संबंधित भागांत गस्त वाढवून नाकाबंदी प्रभावीपणे राबवावी आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

मतदान पथके थेट मतदान केंद्रांवर पोहोचणार असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोचवली जाणार आहेत. या यंत्रांसोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊन ती विहित वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचतील, यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर