Posts

Showing posts with the label तक्रार करा

सणासुदीच्या काळात मुदत संपलेला माल घेवु नका

Image
सणासुदीच्या सेलमध्ये एक्सपायरी संपलेला माल विकताय?  राहुरी। प्रतिनिधी  दिवाळी सणा निमित्त फसव्या जाहिरातींना बळी पडु नका  फसव्या मोहात अडकुन भगार माल खरेदी करु नका आपल्या परिसरात ज्या स्किम सुरु आहेत त्याला परवागी आहे का हे ही पहा  सावधान!स्वस्त खरेदीच्या मोहात आरोग्याशी खेळ नको; ग्राहकांनी वस्तूंची मुदत आणि लेबल तपासण्याचे आवाहन सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलतींचा धडाका सुरू असतो. कमी किमतीत वस्तू मिळत असल्याने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र, या स्वस्त खरेदीच्या मोहात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात नाही ना, याची खबरदारी घेणे आता आवश्यक झाले आहे. सेल आणि डिस्काउंटच्या नावाखाली मुदत संपलेले खाद्यपदार्थ किंवा इतर उत्पादने ग्राहकांच्या माथी मारली जात असल्यास हा गंभीर प्रकार ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे. दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, मॉल्स, सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये विविध वस्तूंवर आकर्षक सवलती जाहीर केल्या जातात. काही ठिकाणी एकावर एक मोफत, विशेष सवलत, क्लिअरन...