Posts

Showing posts from October, 2026

विश्वासात न घेतल्याची नाराजी पण विश्वासाचे राजकारण कुठे?

Image
विश्वासात न घेतल्याची नाराजी; पण विश्वासाचे राजकारण कुठे? भाष्य।शिवाजी घाडगे  ‘मिले सूर मेरा, तुम्हारा तो...’ म्हणत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे सूर जुळवण्याचा प्रयत्न सुरू असताना प्रत्येक नेत्याला आपला सूर महत्त्वाचा वाटत आहे. मात्र सहकाराच्या राजकारणात ‘मला विचारले का नाही?’ या प्रश्नापेक्षा ‘सर्वांना सोबत घेऊन निर्णय झाला का?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीला विरोध नाही, मात्र सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाला पाहिजे, असा सूर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके यांच्यानंतर आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही लावला आहे. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार वाकचौरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, संगमनेर येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेला डावलण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्र...

मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज :अमोल इथापे

Image
मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज : अमोल इथापे । प्रतिनिधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. सुमारे ७०० वर्षांपूर्वी नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच महिमभट, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संत, साहित्यिक आणि विचारवंतांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महान कार्य केले आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असून, या भाषेत साहित्याचा अनमोल ठेवा आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथमित्र अमोल इथापे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित **‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’**निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लिहिलेल्या ग्रंथांचे ‘साहित्यिक रत्न’ या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इथा...

प्रसाद नगरच्या जागेचा प्रश्न सोडणण्या साठ केंद्रीय मंत्री ना आठवले यांची भेट

Image
प्रसादनगरचा जागेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट अहिल्यानगर, दि. २ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर येथील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता केंद्र सरकारच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे २५०  कुटुंबे रहीवास वास्तव्यास असून, या कुटुंबांना पक्की घरे व हक्काची जागा मिळावी, यासाठी नगरसेविका  पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेत विनंती केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता अहिल्यानगर येथील भेटीत प्रसादनगर येथील नागरिकांसाठी केंद्र सरकारची PMAY-U 2.0 योजना मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली. आप्पासाहेब ढूस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर येथील गट ...

आळदीचे 8 विद्यार्थी दिवेआगर समुद्रात बुडून मरण पावले

Image
दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आळंदीच्या विनर्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला विशेष प्रतिनिधी। पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीतील विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथील समुद्रकिनारी आले असताना घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदीसह दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षक, असे एकूण ४८ विद्यार्थी व शिक्षक पर्यटनासाठी दिवेआगर येथील समुद्रकिनारी गेले होते. पर्यटनादरम्यान काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बुडालेल्या आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रेस नोटनुसार, त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : तन्मय दत्तात्रय ...

अहमदनगर जिल्हा बॅकेच्या चाव्या साठी चढाओढ

Image
अहमदनगर जिल्हा बँकेच्या तिजोरीच्या चाव्यांसाठी चढाओढ; मातब्बरांनी बाह्या सरसावल्या २१ जागांसाठी उमेदवारीची रंगत; आमदार-खासदारांसह मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ॥ विशेष प्रतिनिधी ॥ अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, बँकेच्या २१ संचालकपदांच्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी आणखी १६६ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या ८४६ वर पोहोचली आहे. नामनिर्देशनपत्रांची वाढती विक्री पाहता निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, नामनिर्देशनपत्रे घेणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य शेतकरी उमेदवारांची संख्या तुलनेने कमी दिसत असून, राजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळींचीच मोठी उपस्थिती असल्याचे चित्र आहे. आमदार, खासदार तसेच विविध राजकीय पदांवर असतानाही जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...