आळदीचे 8 विद्यार्थी दिवेआगर समुद्रात बुडून मरण पावले

दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
आळंदीच्या विनर्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
विशेष प्रतिनिधी।
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीतील विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथील समुद्रकिनारी आले असताना घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदीसह दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षक, असे एकूण ४८ विद्यार्थी व शिक्षक पर्यटनासाठी दिवेआगर येथील समुद्रकिनारी गेले होते.
पर्यटनादरम्यान काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बुडालेल्या आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रेस नोटनुसार, त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
तन्मय दत्तात्रय वहीले
सुमित भरत अहिरे
प्रणव रामदास बनसोडे
कैवल्य सतीश वासनकर
राजवीर युवराज वहीले
यश किरण वानखेडे
सोहम तुकाराम भांडवलकर
कौस्तुभ संदीप दौंड
सर्व मृत विद्यार्थ्यांचे वय १६ वर्षे असून ते आळंदी, पुणे येथील रहिवासी होते.
या दुर्घटनेनंतर पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आळंदी परिसरात शोककळा पसरली आहे.
सहली दरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक
शैक्षणिक सहली किंवा पर्यटनादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. विशेषतः समुद्र, नदी, धरण, तलाव किंवा इतर जलस्रोतांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध करणे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि प्रशिक्षित शिक्षक अथवा जबाबदार व्यक्तींच्या देखरेखीखालीच पर्यटन करणे आवश्यक आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या नियमांची स्पष्ट माहिती देणे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार