ध्येयाची नशा करा व्यसनाची नाही देवळाली प्रवरात विद्यार्थानी घेतली भारत नशामुक्त शपथ
‘ध्येयाचा नशा करा, व्यसनाचा नाही’; विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प घाडगे न्यूज: प्रतिनिधी भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, जनजागृती व्याख्यान आणि प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी केंद्राच्या प्रमुख विजया दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहकार्याने देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ राबविण्यात येत असून, चार कोटी युवक-युवतींना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यसनमुक्त भारत ही केवळ सरकारी योजना नसून ...