कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन राहुरी। महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पाद...