राहुरीची आमदारकी "दादा" भोवती
राहुरीची आमदारकी ‘दादा’भोवती फिरतेय घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट | @शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा मतदारसंघाची संभाव्य पोटनिवडणूक सध्या विविध ‘दादा’ नावांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. डाॅ सुजय दादा विखे-पाटील, प्राजक्त दादा तनपुरे, अक्षय दादा कर्डीले , हर्ष दादातनपुरे, सत्यजित दादा, या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका कोणता ‘दादा’ आमदार होणार, हे मात्र काळच ठरवेल. नगरपालिकेच्या निवडणुकीतील गुलाल अजून रस्त्यावरून पुसला गेलेला नसतानाच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपकडून अक्षय दादा कर्डीले यांना उमेदवारी दिली जाणार की माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील किंवा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना संधी मिळणार, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा पूर्वीचा इतिहास...