डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचन कट्टा उभारा
देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन घाडगे न्यूज।प्रतिनिधी देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक ज्ञान, वाचन आणि वैचारिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवळाली प्रवरा शहरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. युवकांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा तसेच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना अभ्यासासाठी दर्जेदार व सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ३३७ येथे वाचक कट्टा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन परिसरातील युवकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना सादर करण्यात आले. सचिनभाऊ कोठुळे व सतीशभाऊ वाळुंज यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांच...