खासदार शरद पवार यांनी घेतले सोपानकाका पालखीचे दर्शन
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी प्रथमच दर्शन घेतले आहे.
पालखी गोविंद बाग येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम प्रतिभा पवार यांनी पालखीचे दर्शन घेत वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त केला. त्यानंतर खासदार शरद पवार यांनीही पालखीचे दर्शन घेऊन वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेला अभिवादन केले. त्यांच्या या भेटीची उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये विशेष चर्चा झाली.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा वातावरणात शरद पवार यांनी प्रथमच सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्याने या घटनेकडे अनेकांनी विशेष लक्ष वेधले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात राजकीय घुसखोरी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या दर्शनाला विविध राजकीय अर्थ लावले जात असून, त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या भेटीबाबत शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
शरद पवार यांच्या या पालखी दर्शनामुळे वारकरी परंपरा, अध्यात्म आणि राजकारण यांचा संगम पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला
Comments
Post a Comment