Posts

Showing posts with the label दिवाळी अंक

तरुणाईच्या हातात मोबाईलसोबत पुस्तके हवीत-किशोर मरकड

Image
तरुणाईच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकेही हवीत – किशोर मरकड अहिल्यानगर – विशेष प्रतिनिधी आजच्या डिजिटल युगात तरुणाईच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकेही असणे आवश्यक आहे. मोबाईलच्या माध्यमातून माहिती मिळत असली, तरी पुस्तकांच्या वाचनातून मिळणारे ज्ञान अधिक सखोल आणि आयुष्याला दिशा देणारे असते. त्यामुळे तरुणांनी मोबाईलच्या वापरासोबतच जास्तीत जास्त ग्रंथांचे वाचन करावे, असे प्रतिपादन मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष किशोर मरकड यांनी केले. राज्य शासनाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना किशोर मरकड म्हणाले की, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर हे समृद्ध ग्रंथसंपदेने परिपूर्ण असलेले ग्रंथालय आहे. येथे मराठी विश्वकोशापासून स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांपर्यंत तसेच विविध लेखकांच्या कथा, कादंबऱ्या आणि अन्य साहित्याचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. सुमारे ३२ हजारांहून अधिक पुस्तका...